सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामया: ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दु:ख भाग्भवेत् ॥

नमस्कार बंधू आणि भगिनींनो,

मराठा समाज हा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात ठिक ठिकाणी स्थायिक झालेला दिसून येतो.

इंटरनेटच्या माध्यमातून भारतच काय पण जगभरातील वधू - वरांची माहिती घर बसल्या मिळावी व विवाह योग्य उमेदवारांस मनपसंत जोडीदार शोधणे सोपे जावे , या विचारांनी प्रेरीत होऊन hindumaratha.com हे विवाह विषयक वेब पोर्टल निर्माण केले आहे .

सद्य स्थितीत विवाह विषयक अनेक वेब साईट्स आहेत परंतु त्यांची भरमसाठ फी सर्व सामान्यांना परवडण्याजोगी नसल्यामुळे इच्छा असून देखील अनेक विवाह योग्य गुणवंत स्थळे नेहमीच्याच पारंपारिक पद्धतीने विवाह जमविताना दिसतात. पारंपारिक पद्धतीत बराच वेळ खर्च होतो व निर्णय होण्यासही विलंब होतो. सदर वेब साईटच्या माध्यमातून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त सुयोग्य, उच्च शिक्षित, देश तसेच परदेशातील स्थळे त्वरित व घरच्या घरी पहावयास मिळतील. यातून सर्वांचाच वेळ, श्रम व पैसा निश्चितच वाचेल, त्याचप्रमाणे समाज एकसंघ राहण्यासही मदत होईल.

सदर उपक्रमाचा जास्तीत जास्त समाज बंधू-भगिनींनी लाभ घेऊन, आपल्या मराठी समाजाची सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नती व समाज एकसंघ राहण्यास हातभार लावावा ही नम्र विनंती. धन्यवाद !